वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे.
हा शपथविधी आतापर्यंतचा सर्वात महागडा थपथविधी असणार आहे. तेराशे कोटींपेक्षा जास्त खर्च या शपथविधीवर होणार आहे.
शपथविधीच्या पूर्वसंध्येला ट्रम्प यांच्या स्वागतासाठी मेक अमेरिका ग्रेट अगेन, या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीपासून शपथविधी सोहळ्याला औपचारिक सुरुवात झालीय.
हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेतल्या विविध भागांतून नागरिक वॉशिंग्टनमध्ये दाखल होतायत. अमेरिकन नागरिकांना हव्या असलेल्या बदलाची प्रत्यक्ष सुरूवात या विधीपासून होणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. जगाच्या लक्षात राहिल असा हा सोहळा रंगणार असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.