दाऊदची झोप उडाली, पाकिस्तान ठार करणार दाऊदला

 पाकिस्तानातील एबटाबाद येथे लादेनला अमेरिकन सैन्याने जसे घसून मारले तसा प्रकार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत पुन्हा घडू नये असे पाकिस्तानला वाटते आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार लादेनला पाकिस्तानात लपवून ठेवणे, पाकिस्तानला महागात पडले. 

Updated: Nov 10, 2015, 10:14 PM IST
दाऊदची झोप उडाली, पाकिस्तान ठार करणार दाऊदला  title=

नवी दिल्ली :  पाकिस्तानातील एबटाबाद येथे लादेनला अमेरिकन सैन्याने जसे घसून मारले तसा प्रकार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत पुन्हा घडू नये असे पाकिस्तानला वाटते आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार लादेनला पाकिस्तानात लपवून ठेवणे, पाकिस्तानला महागात पडले. 

एबटाबादमध्ये ओसामा बिन लादेनला लपविणे आणि ठार मारल्यानंतर पाकिस्तान सतर्क झाला आहे. पाकिस्तान कोणत्याही परिस्थितीत दाऊदला भारताच्या हातात देऊ इच्छित नाही. दाऊद प्रकरणी स्वतःला जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडायचे नाही. त्यामुळे पाकिस्तान स्वतः दाऊदला ठार मारून त्याची विल्हेवाट लावण्याचा पर्याय निवडू शकते, असे जाणाकारांचे मत आहे. 

पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील एका सेफ हाऊसमध्ये दोन जणांची बातचीत ऐकून भारतीय एजेन्सीच्या हाती काही पुरावे लागले आहेत.  दाऊदला इस्लामाबाद आणि कराचीतील घरांमध्ये ठेवण्यात आले आहे. 

काही गुप्तचर संघटनांच्या हवाल्याने सांगितले की, दाऊदचे तिकीट कधीही कट केले जाऊ शकतो. आयएसआय दाऊदला विष देऊ शकते. त्यामुळे दाऊदच्या मृत्यूची बातमी कोणालाही माहित होऊ नये याची खबरदारी घेतली जाणार आहे. 

आता दाऊदचे जीवन पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीच्या हातात आहेत. तसेच दाऊदी पत्नी महजबीन, दाऊदचा मुलगा मोईन, मुलगी माहरूख आणि महेरीन यांच्या हालचालींवरही गुप्तचर एजन्सी नजर ठेवून आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.