पाकिस्तान इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती बनले ‘मनमोहन सिंग’

पाकिस्तानच्या एका बहूचर्चित आर्थिक संस्थेकडून नकळत एक चूक झाली... पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आपल्या वार्षिक दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षतेसाठी पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ‘मनमोहन सिंग’ यांना आमंत्रण देण्यात आलं. आणि मग काय, एकच ‘गहजब’ उडाला.

Updated: Oct 25, 2014, 04:03 PM IST
पाकिस्तान इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती बनले ‘मनमोहन सिंग’ title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या एका बहूचर्चित आर्थिक संस्थेकडून नकळत एक चूक झाली... पुढच्या आठवड्यात होणाऱ्या आपल्या वार्षिक दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षतेसाठी पाकिस्तानी इस्लामी प्रजासत्ताकचे राष्ट्रपती ‘मनमोहन सिंग’ यांना आमंत्रण देण्यात आलं. आणि मग काय, एकच ‘गहजब’ उडाला.

इस्लामाबाद स्थित ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकोनॉमिक्स’चा (पीआयडीई) २८ ऑक्टोबर रोजी दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेला या दीक्षांत सोहळ्याच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्तानचे राष्ट्रपती मामनून हुसैन यांना आमंत्रण द्यायचं होतं.

‘दुनिया न्यूज’ या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, चुकीनं संस्थेच्या सरकारी निमंत्रण पत्रावर मामनून हुसैन यांच्याऐवजी मनमोहन सिंग यांचं नाव प्रिंट झालं... आणि अशा पद्धतीनं पीआयडीईनं भारताच्या माजी पंतप्रधानांना पाकिस्तानच्या राष्ट्रपती पदावर बसवलं.

ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीनं ती सुधारली गेली पण एव्हाना खूप उशीर झाला होता... आणि हे सरकारी निमंत्रण कार्ड अनेक प्रमुख अतिथींपर्यंत पोहचलं होतं.

यानंतर मात्र ‘पीआयडीई’चा कोणताही अधिकारी याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.