२४ तासात पाकिस्तानकडून ७० भारतीय चौक्यांवर गोळीबार

गेल्या २४ तासात पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत ७० भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. काश्मीरमध्ये एलओसीवर तंगघारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे.

Updated: Oct 29, 2016, 12:37 PM IST
२४ तासात पाकिस्तानकडून ७० भारतीय चौक्यांवर गोळीबार title=

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत ७० भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. काश्मीरमध्ये एलओसीवर तंगघारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी हा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे.

आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबाराचा प्रयत्न सुरुच असतो. भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानच्या सैन्याला प्रत्यूत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तानचे ८ सैन्य मारले गेले आहे तर एक जवान शहीद झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कठुआ, हिरानगर, आरएस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. पाकिस्तानकडून मशीनगन, 82 एमएम मोर्टारचा देखील वापर होत आहे.