पाकिस्तानात होतो का व्हॅलेंटाइन डे

जगभरात व्हॅलेंटाइन वीक धूम आहे. प्रत्येक जण व्हॅलेंटाइन डेला काय करणार याचा विचार करत आहे. पण तुम्हांला माहिती आहे का तुमच्या शेजारच्या देशात म्हणजे पाकिस्तानात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे का नाही.... तर त्याचे उत्तर आहे नाही.

Updated: Feb 12, 2016, 07:09 PM IST
पाकिस्तानात होतो का व्हॅलेंटाइन डे  title=

कराची : जगभरात व्हॅलेंटाइन वीक धूम आहे. प्रत्येक जण व्हॅलेंटाइन डेला काय करणार याचा विचार करत आहे. पण तुम्हांला माहिती आहे का तुमच्या शेजारच्या देशात म्हणजे पाकिस्तानात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे का नाही.... तर त्याचे उत्तर आहे नाही.

पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी नासीर अली खान यांनी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मनाई केली आहे. साजरा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

व्हॅलेंटाइन डे हा इस्लामचा अपमान करणारा सण आहे. त्यामुळे मुस्लिम कट्टरवाद्यांननी त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे एक मुस्लिम राष्ट्र म्हणून पाकिस्तानेही यावर बंदी घातली आहे. 

पाकिस्तान हा केवळ एकमेव इस्लामिक देश नाही की ज्याने पाश्चात्य सणांवर बंदी घातली आहे.