www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेतलं बोस्टन बॉम्बस्फोटानं हादरलं असताना आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये रिसिन हा विषारी पदार्थ सापडलाय. एफबीआयनं ही माहिती दिलीय.
ओबामांच्या पत्राची छाननी करणा-या विभागाच्या हाती हे पत्र लागलं. अशाच पद्धतीचं एक पत्र सिनेटर कार्ल लेविन यांना पाठवण्यात आलं होतं. पण या पत्राचा आणि बोस्टन बॉम्बस्फोटांचा संबंध नसल्याचं सांगण्यात आलंय.
दरम्यान, बोस्टन स्फोटानंतर व्हाईट हाऊसच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. बोस्टन बॉम्बस्फोटानंतर काही गोष्टी पुढे आल्या. त्यात एका व्यक्तीने तेथील फोटो काढला आहे. या फोटोत बिल्डिंगच्या वर एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले आहे.