www.24taas.com, बोस्टन
अमेरिकेच्या बोस्टन शहरातील मॅरेथॉनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेसारखं शक्तीशाली राष्ट्राच्याही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
मात्र आधुनिक टेक्नलॉजीने अनेक गोष्टीने सोप्या केल्या आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट करणाऱ्या गुन्हेगारांना वाचणं सोपं जाणार नाही. कारण की, आरोपी त्यामुळे लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे. नव्या टेक्नॉलॉजीचा बऱ्याचदा फायदाही होतो.
बोस्टन बॉम्बस्फोटानंतर काही गोष्टी पुढे आल्या. त्यात एका व्यक्तीने तेथील फोटो काढला आहे. या फोटोत बिल्डिंगच्या वर एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचे आढळले आहे. आणि या स्फोटादरम्यानच हा फोटो काढण्यात आला आहे. हा फोटो स्फोटातील एक महत्त्वाचा धागा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.