पोप फ्रान्सिसनं 'पाप' स्वीकारलं

वेटिकन सिटीमध्ये पोपनं जुन्या विचारांना फाटा देत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून दिलीत.

Updated: Sep 16, 2014, 09:35 AM IST
पोप फ्रान्सिसनं 'पाप' स्वीकारलं

वेटिकन सिटी : वेटिकन सिटीमध्ये पोपनं जुन्या विचारांना फाटा देत ‘लिव्ह-इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांची लग्न लावून दिलीत.

उल्लेखनीय म्हणजे, लग्नाशिवाय स्त्री-पुरुषांनी एकत्र राहणं धार्मिकरित्या पाप मानलं जातं. परंतु, पोप फ्रान्सिस यांनी या रुढींना आणि विचारांना तोडत या जोडप्यांना विवाह बंधनात अडकवण्यात मदत केलीय. 

या सोहळ्यात ‘सिंगल मदर’ आणि अगोदरपासूनच विवाहीत असलेल्या काही जणांचा समावेशदेखील होता. 

वेगवेगळे सोशल बॅकग्राऊंड असणाऱ्या ४० जोडप्यांना लग्न करण्यासाठी पोप फ्रान्सिस यांनी प्रोत्साहन दिलंय. पोप खूप कमी वेळा लग्न लावून देताना दिसतात. पोपनं गेल्या वेळेस २००० साली काही जोडप्यांची लग्न लावली होती. 

दोन तासांच्या या लग्न समारोहात पोपनं नवविवाहीत जोडप्यांना काही सल्लेही दिले. लग्न ही काही सोपी गोष्ट नाही, यामध्ये अनेक चढ-उतार असतात, असं पोपनं यावेळी म्हटलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.