मृत्यूनंतर १९ वर्षांनीही प्रिन्सेस डायनाचा व्हिडिओ होतोय वायरल

ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Updated: Jul 7, 2016, 10:17 AM IST
मृत्यूनंतर १९ वर्षांनीही प्रिन्सेस डायनाचा व्हिडिओ होतोय वायरल title=

मुंबई : ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल-फाएद यांचा १९९७ साली एका कार अपघातात मृत्यू झाला होता. हा एक निव्वळ अपघात होता की यामागे काही घातपात होता, यावर अजूनही चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रिन्सेस डायनाचा हा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या मुलाखतीत डायनानं आपण कधीही 'राणी' बनू शकणार नाही, असं म्हटलं होतं. 

डोडीच्या मुलाची आई बनणार होती डायना?

बकिंघम पॅलेस डायना आणि तिचा मुस्लीम प्रियकर डोडी यांच्या वाढत्या जवळकीमुळे हैराण झालं होतं, असाही दावा केला जातोय. इतकंच नाही तर डोडीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूसमयी डायना गर्भवती होती. ३१ ऑगस्ट १९९७ रोजी अपघात झाला त्यावेळी डायना-डोडी याचाच आनंद साजरा करण्यासाठी निघाले होते. दोघांनी लग्न करून फ्रान्समध्ये स्थायिक होण्याचा निर्णयही घेतला होता. परंतु, ब्रिटिश राजघराण्याला मात्र हे मान्य नव्हतं. यासाठीच त्यांनी दोघांची हत्या घडवून आणली.