टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला चावला अजगर

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. बँकॉकमध्ये टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अजगर चावल्याची घटना घडलीये. 

Updated: May 26, 2016, 04:37 PM IST
टॉयलेटमध्ये गेलेल्या व्यक्तीला चावला अजगर title=

बँकॉ़क : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. बँकॉकमध्ये टॉयलेटमध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अजगर चावल्याची घटना घडलीये. 

डेली मेलनुसार हा अजगर चार मीटर लांब होता. ३८ वर्षीय अथापोर्न बूनमाकचुए शौचास बसले असताना अजगरने चावा घेतला. अजगर सीवर पाइपच्या सहाय्याने कमोडपर्यंत पोहोचला होता. 

अजगरच्या चाव्यामुळे बूनमाकचुए जखमी झाले. अखेर या सापाला पकडण्यासाठी इर्मजन्सी सर्व्हिसला कॉ़ल करुन घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि टॉयलेट सीट तोडून अजगराला पकडण्यात आले.