रघुराम राजन बनले 'बीआयएस'च्या उपाध्यक्षपदी बसणारे पहिले भारतीय!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे आता बँक फॉर इंटननॅशनल सेटलमेंटस् (बीआयएस) चे व्हाईस चेअरमन बनलेत. या पदावर बसणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. 

Updated: Nov 11, 2015, 04:57 PM IST
रघुराम राजन बनले 'बीआयएस'च्या उपाध्यक्षपदी बसणारे पहिले भारतीय! title=

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन हे आता बँक फॉर इंटननॅशनल सेटलमेंटस् (बीआयएस) चे व्हाईस चेअरमन बनलेत. या पदावर बसणारे रघुराम राजन हे पहिले भारतीय गव्हर्नर आहेत. 

जशी 'आरबीआय' ही देशातील सगळ्या बँकांची बँक आहे... तशीच 'बीआयएस' जगभरातील सेंट्रल बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. 

बीआयएस बोर्डाच्या एका मीटिंगमध्ये राजन यांना 10 नोव्हेंबर 2015 पासून तीन वर्षांसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर निवड झालीय. राजन यांनी डिसेंबर 2013 पासून बीआयएस बोर्डात आपला सहभाग नोंदवलाय. 

व्हाईस चेअरमन म्हणून रघुराम राजन हे बीआयएसचे चेअरमन जेन्स वीड मान यांच्यासोबत काम करणार आहेत. मान हे जर्मनीच्या बुंडिस बँकेचेही अध्यक्ष आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.