'तो' क्षण जवळ येताना... काय दिसतं तुम्हाला?

बऱ्याच जणांना आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागते... पण, ही चाहूल म्हणजे नेमकं काय असतं... काय दिसतं बरं मृत्यूपूर्वी आपल्याला?

Updated: Oct 28, 2015, 12:41 PM IST
'तो' क्षण जवळ येताना... काय दिसतं तुम्हाला? title=

मुंबई : बऱ्याच जणांना आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागते... पण, ही चाहूल म्हणजे नेमकं काय असतं... काय दिसतं बरं मृत्यूपूर्वी आपल्याला?

या गोष्टीवर संशोधन करणाऱ्यांच्या अभ्यासात याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात आलीय... ती म्हणजे मृत्यूपूर्वी एखाद्या व्यक्तीला आपल्या जवळचे मृत नातेवाईक किंवा मृत मित्र मैत्रिणींच्या प्रतिकृती दिसतात. त्यामुळे, व्यक्तीचे शेवटचे काही तासही सुखद अनुभव देतात.

यासाठी, न्यूयॉर्कच्या कॅनिशिअस महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी 66 रुग्णांचा अभ्यास केलाय. हे सर्व रुग्ण आपल्या शेवटच्या घटना मोजत होते... शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतिम दिवसांत यातील बहुतेक रुग्णांना दिवसातून एका तरी व्यक्तीची प्रतिकृती आपल्या आसपास असल्याचा भास झाला.  

या आकृत्या व्यक्तीला मरणापूर्वी महिनाभर, काही आठवडे, काही दिवस किंवा काही तासांपूर्वीही दिसू शकतात. यामुळे त्यांची मरणाची भीती हळूहळू कमी होऊ लागते आणि त्यांचा शेवटचा प्रवास सुखकर होतो, असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. 

मात्र, शेवटच्या क्षणी व्यक्तीला अशा आकृत्या का दिसतात? याबद्दल मात्र तज्ज्ञांचं अजूनही मतभिन्नता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.