इस्लामाबाद : काळ्यापैशा विरोधात अवलंबलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा प्रभाव शेजारील देशांवर देखील पडत आहे, पाकिस्तानात सुद्धा मोठ्या नोटांवर बंदी आणण्याची तयारी सुरू आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खानने संसदेत प्रस्ताव ठेवला होता, त्यात ५००० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्याची चर्चा होती.
पाकिस्तानातील राज्यकर्त्यांच्या तयारी मागचा उद्देश हा की काळ्यापैशावर आळा बसावा आणि लोकांना अधिकाधिक बॅंकींग सेवांच्या उपय़ोगासाठी उत्साहीत करावे.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे पाऊले उचलणे अशावेळी सुरू झाले की भारतात देखील भष्ट्राचार आणि काळ्यापैशा विरोधात अभियान सुरु आहे. गेल्या ८ नोव्हेंबरला पीएम नरेंद्र मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच नव्याने ५०० आणि २००० हजारच्या नोटा चलनात आणणार असल्याचे सांगितले होते.
भारत सरकारने काळ्या पैशावर आणि भष्ट्राचारावर अंकुश बसवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि अंतिम निर्णय घेतला आहे.