www.24taas.com, ब्रसेल्स
एअरपोर्टचा परिसर... विमान उडायला सज्ज झालंय... अचानक दोन कारमधून आठ जण (काळ्या कपड्यानं चेहरा लपवलेला) सुस्साट वेगात... गेट तोडून टर्मेकवर धडकतात... सगळेच जण पोलिसांच्या पोशाखात... पण, हत्यारांशिवाय... केवळ तीन मिनिटांत कुणाला धक्का पोहचवल्याशिवाय करोडोंचे हिरे रफूचक्कर होतात...
तुम्हाला ही एखादी हॉलिवूडची स्टोरी सांगतोय, असं वाटलं की काय... नाही... ही खरी स्टोरी आहे अगदी रिअल... बेल्जिअममध्ये घडलेली... बेल्जिअमच्या एअरपोर्टवर अवघ्या तीन मिनिटांत सगळ्यांच्या डोळ्यांदेखत आठ जणांनी तब्बल ५० मिलियन डॉलर म्हणजेच जवळजवळ २७० करोड रुपये किंमतीचे हिरे पळवलेत. काय घडतंय हे कलायच्या आधी हिऱ्यांनी भरलेले १२० बॉक्स गायब झाले... स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास आठ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली म्हणजेच भारताच्या वेळेनुसार रात्रीचे साडे बारा...
जगभरात आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यात मोठ्या लूटीमधला हा एक प्रकार आहे, असा दावा हिऱ्यांच्या ग्लोबल सिंडीकेट ‘एंटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटर’नं केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये काही कच्चे तर काही तयार हिऱ्यांचा समावेश होता.
सिक्युरिटी एजन्सी ‘ब्रिंक्स’च्या कर्मचाऱ्यांनी हिऱ्यांचे १२० बॉक्स स्वित्झर्लंडच्यू ज्यूरिख जाणार्या स्विस पॅसेंजर एअरक्राफ्टमध्ये चढवले होते न होते तेवढ्यात हे लुटारू घटनास्थळी पोहचले. त्यातल्या एकानं मशीनगन उपस्थित गार्डसवर रोखली आणि बाकिच्यांनी हिऱ्यांनी भरलेले बॉक्स कारमध्ये चढवले... आणि सगळेजण आल्यामार्गे परत फिरले... विमानात बसलेल्या जवळपास २० पॅसेंजर्सना या घटनेची भनकदेखील लागली नाही. चौकशीला सुरुवात झाल्यानंतर लुटारुंची एक कार एअरपोर्टजवळच जळालेल्या अवस्थित मिळाली.