'सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी'

बूकर पुरस्कार विजेते सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी व्हायची असा खुलासा त्यांची पत्नी पद्मलक्ष्मी यांनी केली आहे.

Updated: Mar 7, 2016, 08:22 PM IST
'सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी'

मुंबई: बूकर पुरस्कार विजेते सलमान रश्दींकडून वारंवार सेक्सची मागणी व्हायची असा खुलासा त्यांची पत्नी पद्मलक्ष्मी यांनी केली आहे. सलमान रश्दी आपल्याला त्रास द्यायचे, आणि चुकीची गुंतवणूक असं म्हणून मला वारंवार हिणवायचे असंही पद्मलक्ष्मी म्हणाल्या आहेत. 

तसंच लिटरेचरमधलं नोबेल मिळत नसल्यामुळे रश्दींचं दरवर्षी सांत्वन करायला लागायचं असा दावाही पद्मलक्ष्मींनी केला आहे. पद्मलक्ष्मी यांनी आपल्या पुस्तकामध्ये हे धक्कादायक खुलासे केले आहेत.

सलमान रश्दी आणि पद्मलक्ष्मी यांचा घटस्फोट झाला आहे. सलमान रश्दी यांना बूकर पुरस्कार मिळाला आहे, तर पद्मलक्ष्मी या इंडियन अमेरिकन मॉडेल आहेत.