स्कॉटलंड यार्डच्या पहिल्या महिला पोलीस कमिश्नर

 लंडनच्या नागरिकांचे संरक्षण करणार असं कमिश्नर पदाची सूत्र हाती घेताच क्रेसिडिया डिक यांनी सांगितलं आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 12, 2017, 08:12 PM IST
स्कॉटलंड यार्डच्या पहिल्या महिला पोलीस कमिश्नर title=

लंडन : क्रेसिडिया डिक स्कॉटलंड यार्डच्या पहिला महिला पोलीस कमिश्नर झाल्या आहेत.  स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या १८७ वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच कमिश्नरपदी महिला विराजमान झाली आहे. लंडनच्या नागरिकांचे संरक्षण करणार असं कमिश्नर पदाची सूत्र हाती घेताच क्रेसिडिया डिक यांनी सांगितलं आहे. 

सुमारे ४३ हजार कर्मचारी त्यांच्या हाताखाली काम करणारयतं. सोमवारी त्यांनी कमिश्नर पदाचा कार्यभार स्वीकारला.  ३ अब्ज पाऊंडचं सिक्युरिटी बजेट त्यांना सांभाळायचंय. 

गेली ३० वर्ष त्या या सेवा बजावतायत. त्यांचं संपूर्ण शिक्षण ऑक्सफोर्डमध्ये झालं. कृषी आणि वनशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी काही काळ अकाऊंटन्सीमध्ये काम केलं. त्यांना दोन मुलं आहेत.