भारताबाहेरही वाढते हिंदूंची लोकसंख्या

अमेरिकेने केलेल्या संशोधनानुसार २०७५पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढेल, असे म्हटले होते. त्यानुसार २०५०पर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल असे सांगण्यात येत होते. मात्र, आर्यलॅंडमध्ये हिंदूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Intern - | Updated: Apr 12, 2017, 01:31 PM IST
भारताबाहेरही वाढते हिंदूंची लोकसंख्या title=

वॉशिंग्टन : अमेरिकेने केलेल्या संशोधनानुसार २०७५पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढेल, असे म्हटले होते. त्यानुसार २०५०पर्यंत भारतामध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल असे सांगण्यात येत होते. मात्र, आर्यलॅंडमध्ये हिंदूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आर्यलॅंडमध्ये झालेल्या २०१६च्या जनगणनेनुसार मागील पाच वर्षांत आर्यलॅंडमध्ये हिंदूची संख्या ३४ टक्क्यांनी वाढली आहे. 
आर्यलॅंड हा ख्रिश्चन देश आहे. या देशात रोमन कॅथलिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

४.७६ मिलीयन लोकसंख्या असलेल्या आर्यलॅंड देशात ३.७३ मिलीयन रोमन कॅथलिक लोक राहतात.