पॅरिस: फ्रान्समधल्या वेश्या व्यवसाय थांबवण्यासाठी संसदेमध्ये नवा कायदा पास करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता पैसे घेऊन सेक्स करायला परवानगी देण्यात आली आहे, तर पैसे देऊन सेक्स करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
यामुळे देहविक्री करणाऱ्याला कोणतीही शिक्षा होणार नाही, तर ग्राहकाला 3750 युरो म्हणजेच 2 लाख 84 हजार 752 रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. तर पहिल्यावेळी पकडलं गेल्यास 1500 युरो दंड होणार आहे.
या कायद्यामुळे परदेशी दलालाचं नेटवर्क तुटेल, तसंच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना यातून बाहेर काढणं सोपं होईल, असा विश्वास फ्रान्समधल्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या कायद्यावरुन गेले 2 वर्ष फ्रान्समध्ये मोठा वाद झाला होता. फ्रान्सच्या संसदेमध्येही या कायद्यावरुन बरेच मतभेद झाले होते.