या सेलिब्रिटीनं न्यूड होऊन पूर्ण केलं आइस बकेट चॅलेंज

सध्या संपूर्ण जगात आइस बकेट चॅलेंजची चर्चा सुरू आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे याला पूर्ण करत आहेत. एका अहवालानुसार, आता कॉमेडियन महिलेनं आइस बकेट चॅलेंज स्‍वीकारलं आणि न्यूड होऊन ते पूर्ण केलं आहे.

Updated: Sep 1, 2014, 06:21 PM IST
या सेलिब्रिटीनं न्यूड होऊन पूर्ण केलं आइस बकेट चॅलेंज title=

लंडन : सध्या संपूर्ण जगात आइस बकेट चॅलेंजची चर्चा सुरू आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे याला पूर्ण करत आहेत. एका अहवालानुसार, आता कॉमेडियन महिलेनं आइस बकेट चॅलेंज स्‍वीकारलं आणि न्यूड होऊन ते पूर्ण केलं आहे.

कॉमेडियन कॅथी ग्रिफिननं या चॅलेंजला पूर्णपणे नग्न होत पूर्ण केलं आहे. आइस बकेट चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी 53 वर्षीय कॅथीनं पूर्ण कपडे उतरवले. त्यानंतर मित्रानं एका स्विमिंग पूलच्या काठावर तिच्यावर बादली भरुन बर्फ टाकले. आइस बकेट चॅलेंजसाठी कॅथीला पाच मित्रांनी चॅलेंज केलं होतं.

तिनं म्हटलं की, मित्र आणि आर्थिक गुरू स्यूज ऑर्मननं एएलएस आइस बकेट चॅलेंज न्यूड होऊन पूर्ण करायला सांगितलं होतं.

कॅथीनं आपल्या चॅलेंजचा व्हिडिओ यू-ट्यूबवर पोस्ट सुद्धा केला आहे. या व्हिडिओत कॅथी तिच्या मित्रांना म्हणते की, ओके स्यूज ऑर्मन, मी आइस बकेट चॅलेंज घेण्यासाठी तयार आहे आणि तेही न्यूड होऊन.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.