नवी दिल्ली : एका १७ वर्षाच्या युवतीने शाळेत लोकप्रिय होण्यासाठी एका आठवड्यापासून अन्न आणि पाण्यालाही तोंड लावलं नाही. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, एल्ले लिएटवोज नावाच्या एका युवतीने शाळेत लोकप्रिय होण्याची पैज जिंकण्यासाठी हे पाऊल उचललं.
या युवतीने असं केल्याने तिचं ३० ते ३५ किलो वजन कमी झालं, ती एवढी सळपातळ झाली, तिची हाडं दिसायला लागल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागलं.
या युवतीच्या हातापायातील रक्ताभिसरण बंद झालं होतं, नखं काळी पडली होती, सध्या तिला डॉक्टरांनी वाचवलं आहे. एक आठवडाभर अन्न आणि पाणी त्यागल्याने तिचे पिरयडसही बंद झाले आहेत.
माझ्यातील उर्जा संपल्यासारखं मला वाटतंय, मी मृत्यूच्या एवढ्या जवळ आल्याचं मला कळलंच नाही, तिचं लिव्हर आणि किडनीही खराब होण्याच्या मार्गावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.