बीजिंग: दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगत्सी नदीत ४५० प्रवाशांना घेऊन जाणारं जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. जहाजातील २२ प्रवाशांना वाचवण्यात अधिकाऱ्यांना यश मिळालं असून इतर प्रवाशांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'इस्टर्न स्टार' नावाचं हे जहाज पूर्वेकडील नानजिंग शहरापासून चाँगकिंग शहराकडे जात असताना सोमवारी रात्री बुडालं. त्यावेळी जहाजावर ४५० हून अधिक प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीनं धाव घेतली.
दरम्यान काही पर्यटक पोहत किनाऱ्याला लागलं तर काहींना तिथल्या मच्छिमारांनी वाचवल्याचं समजतंय. ४०० प्रवाशांमध्ये अधिक प्रवासी वृद्ध आहेत. हवा आणि मुसळधार पावसामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.