२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय. 

Updated: Jul 10, 2015, 02:00 PM IST
२६/११ च्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान राजी title=

ऊफा (रशिया) : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपींच्या आवाजाचे नमुने देण्यास पाकिस्तान अखेर तयार झालाय. 

दरम्यान, पुढच्या वर्षी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क संमेलनाचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारल्याचंही भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय. 

मोदी-शरीफ भेटीचं फलित काय? यावर एक नजर टाकूया...

  • पाकिस्तान-भारत दहशतवाद नष्ट करण्यात सहकार्य करणार

  • २६/११ च्या तपासात पाक भारतला सहकार्य करणार

  • आरोपीच्या आवाजाचे नमुने भारताला देण्यास पाक तयार

  • दोन्ही देशांचे लष्करी महासंचालक नियमितपणे चर्चा करणार

  • पकड़लेले मच्छिमार बोटीसह १५ दिवसात सोडण्याचा  निर्णय

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात ५५ मिनिटं झालेल्या चर्चेत दक्षिण आशियातल्या दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आज वर्षभराहून अधिक काळानंतर प्रथमच भेट घेतली. रशियातल्या ऊफा शहरात आज शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या नेत्यांची शिखर परिषद होतेय. या संघटनेत भारताला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आलाय. मोदींच्या शपथविधीला शरीफ यांची उपस्थितीत, आणि त्यानंतर मोदी-शरीफ यांच्यात प्रस्थापित झालेल्या सलोखा वर्षभरापूर्वी बराच चर्चेत आला. पहिला भेटीतच भारत-पाक संबंध सुधारण्याचा निश्चय दोन्ही नेत्यांनी केला होता. पण पाकनं काश्मीरमधल्या फुटीरतावादी हुर्रियतच्या नेत्यांशी स्वतंत्र बातचीत करण्याचा घाट घातला. त्यावर भारतानं तीव्र निषेध व्यक्त करून पाकशी होणाऱ्या सगळ्या चर्चा थांबवल्या....त्यानंतर आज झालेल्या चर्चेनं दोन्ही देशातले संबंध सुधारायला मदत होईल अशी अपेक्षा आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.