इंग्लडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील थेरेसा मे

पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी म्हटलंय, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सुत्रे गृहमंत्री थेरेसा या बुधवारी स्वीकारतील.

Updated: Jul 12, 2016, 12:01 AM IST
इंग्लडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील थेरेसा मे

लंडन : पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी म्हटलंय, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सुत्रे गृहमंत्री थेरेसा या बुधवारी स्वीकारतील.

कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अँन्ड्रिया लिडसोम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्यामुळे थेरेसा मे यांना कोणीही प्रतिस्पर्धी उरला नाही.     पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अँन्ड्रिया लिडसोम यांनी अनपेक्षितपणे माघार घेतली.

कॅमेरून बुधवारी राणी एलिझाबेथ यांच्याकडे अधिकृतरित्या राजीनामा सादर करतील .मंगळवारी मंत्रिमंडळाची शेवटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कॅमेरून भूषवतील.