इंस्टाग्रामवर एक फोटो टाकण्यासाठी त्यांना मिळतात करोडो रुपये

मुंबई : ग्लॅमर, नाव आणि पैसा कोणाला नको असतो? मॉडेलिंगच्या क्षेत्रात काही जणांना भले भरपूर स्ट्रगल करावे लागत असेल, पण एकदा का तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलात की मग आकाश ठेंगणे वाटू लागते. 

Updated: Mar 1, 2016, 11:34 AM IST
इंस्टाग्रामवर एक फोटो टाकण्यासाठी त्यांना मिळतात करोडो रुपये title=

मुंबई : ग्लॅमर, नाव आणि पैसा कोणाला नको असतो? मॉडेलिंगच्या क्षेत्रात काही जणांना भले भरपूर स्ट्रगल करावे लागत असेल, पण एकदा का तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचलात की मग आकाश ठेंगणे वाटू लागते. 

सध्या आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात तीन चार चेहरे फार प्रसिद्ध आहेत. त्यांचे सौंदर्य हे त्यांच्याविषयीच्या चर्चांचे कारण असले तरी खरे कारण त्यांना त्यांच्या फोटोजसाठी मिळणारा पैसा हे आहे. कँडल जेनर, कारा डेलेव्हिन आणि गिगी हॅडिन अशा या तीन मॉडेल्स आहेत.

इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर फोटो अपलोड करण्याचे किती पैसे मिळतात त्याचा आकडा ऐकला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कँडल जेनर या मॉडेलला इंस्टाग्रामवर तब्बल ४.३९ फॉलोअर्स आहेत. तिला इंस्टाग्रामवर एक फोटो अपलोड करण्याचे तब्बल २ कोटी ते ८३ लाख रुपये मिळतात. डेली मेल या वृत्तपत्राने यासंबंधीची माहिती दिली आहे.

कँडल जेनरनंतर नंबर लागतो कारा डेलेव्हिन आणि गिगी हॅडिन यांचा. त्यांनाही कँडलपेक्षा कमी पण एक एक फोटो अपलोड करण्यासाठी लाखो डॉलर्स मिळतात.