इसिसचा सेक्ससाठी क्रूरपणा

जगातील सर्वात भयानक आणि क्रूर दहशतवादी संघटना म्हणून आयसिसकडे पाहिले जातेय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या नागरिकांवर आयसिसकडून भयंकर अत्याचार केले जातायत. याचीच शिकार झाली होती २१ वर्षीय नादिया मुराद. तिने संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा परिषदेदरम्यान आयसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर आणला होता. तिचा तो भयानक अनुभव ऐकून तेथील उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. 

Updated: Jan 2, 2016, 05:19 PM IST
 इसिसचा सेक्ससाठी क्रूरपणा title=

लंडन : जगातील सर्वात भयानक आणि क्रूर दहशतवादी संघटना म्हणून आयसिसकडे पाहिले जातेय. इराकच्या अल्पसंख्यांक यजीदी समुदायाच्या नागरिकांवर आयसिसकडून भयंकर अत्याचार केले जातायत. याचीच शिकार झाली होती २१ वर्षीय नादिया मुराद. तिने संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा परिषदेदरम्यान आयसिसचा आणखी एक क्रूर चेहरा जगासमोर आणला होता. तिचा तो भयानक अनुभव ऐकून तेथील उपस्थितांच्या डोळ्यातही पाणी आले. 

नादिया तब्बल तीन महिने आयसिसच्या विळख्यात होती. या दरम्यान तिला अनेक अत्याचारही सहन करावे लागले. मात्र अखेर तिला तेथून पळ काढण्यात यश मिळाले. 

जेव्हा त्य़ा दहशतवाद्यांनी आमच्या गावात प्रवेश केला तेव्हा त्यांनी अनेक मुलांना, वृद्ध आणि तरुणांना ठार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी वृद्ध महिलांनाही ठार केले आणि आम्हा मुलींना ते मोसूलला घेऊन गेले. आम्ही जेव्हा मोसूलला पोहोचलो तेव्हा तिथे अनेक जियादी स्त्रिया होत्या. स्त्रियांवर अक्षरश: घृणास्पद पद्धतीने अत्याचार केले जात होते. 

बलात्काराआधी ते आम्हाला प्रार्थना करायला सांगत त्यानंतर हे विकृत कृत्य केले जात असे. काही महिलावर सामूहिक बलात्कार केले जात. इस्लामच्या नावाखाली हे सर्व केले जात असे, असं नदियाने सांगितलं.