केनियाची ही महिला फोटोशॉपद्वारे फिरली जग

केनियाच्या या महिलेचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. एका रात्रीत ही महिला इंटरनेट स्टार बनलीये. 

Updated: Mar 27, 2016, 02:43 PM IST
केनियाची ही महिला फोटोशॉपद्वारे फिरली जग title=

नवी दिल्ली : केनियाच्या या महिलेचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आहेत. तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळालेत. एका रात्रीत ही महिला इंटरनेट स्टार बनलीये. 

सेव्हलिन असं या महिलेचे नाव आहे. तिला जगभर फिरण्याची आवड आहे. मात्र पैसे नसल्याने ती फिरु शकत नाहीये. मात्र तिने आपली ही इच्छा पूर्ण कऱण्यासाठी एक भारी शक्कल लढवलीये. 

तिला चीनमध्ये फिरण्याची इच्छा होती त्यासाठी तिने आपला फोटो फो़टोशॉपद्वारे चीनच्या भितींजवळ चिकटवला आणि आपल्या फेसबुकवर हा पोस्ट केला. काही फोटोत ती विमानाजवळ दिसतेय तर काही फोटोंत ती मंदिरासमोर उभी असलेली दिसतेय. 

तिच्या या फोटोंना अनेक लाईक्स मिळतायत. तिच्या नावाचे हॅशटॅग कॅम्पेनही सुरु झालंय.