रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला!

कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.

Updated: Jul 12, 2016, 04:51 PM IST
रिअल लाईफ पाकिस्तानी 'क्वीन'...पतीशिवाय निघाली हनीमूनला! title=

लाहोर : कंगना रानौतचा 'क्वीन' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल... रिल लाईफमधली ही 'क्वीन' पतीला सोडून हनीमूनला निघालेली आपण पाहिली... आता मात्र रिअललाईफमधली एक 'क्वीन' आपल्या पतीला सोडून हनीमूनला निघालीय.


हुमा आणि अरसलान

या क्वीनचं खरं नाव आहे हुमा मोबिन... मूळची पाकिस्तानची.. ती सध्या तिच्या पतीला त्याच्याच देशात सोडून हनीमूनला निघालीय... 


रिअल लाईफ क्वीन हुमा

हुमा आणि अरसलान सीवर बट यांचा निकाह सात महन्यांपूर्वी पार पडला... दोघांनाही फिरण्याच छंद... मग काय हनीमूनसाठी त्यांनी ग्रीस गाठायचं ठरवलं... परंतु, इथंच घोडं अडलं... अरसलानला व्हिजा नाकारण्यात आला.


रिअल लाईफ क्वीन हुमा

पतीसोबत येणार नाही, हे समजल्यानंतर हुमानंही आपला प्लान रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पैसे परत मिळणार नाही हे पाहून हुमानं आपल्या सासू-सासऱ्यांसोबत ग्रीसला जाण्याचा निर्णय घेतला.


रिअल लाईफ क्वीन हुमा

या प्रवासात आपल्या पतीला ती खूपच मिस करतेय... ती सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर करतेय. या क्वीनचे हे फोटो सोशल मीडियावर हीट ठरलेत.