मॉस्को: आपल्याला विचलित करणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रशियाच्या मॉस्को इथं एका अपघातात दोन चिमुरड्यांचा बळी गेलाय. कारनं रस्ता ओलांडणाऱ्या तीन चिमुरड्यांना चिरडलं. हा संपूर्ण अपघात कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झालाय.
आपल्या दोन जुळ्या मुलांना पुशचेअरमध्ये घेऊन आणि सोबत लहान मुलीसह आई-वडील रस्ता ओलांडत होते. तेव्हा आईनं कार पाहिली आणि ती जरा थबकली. पण कार ड्रायव्हर कारची स्पीड कमी करेल, असं वाटून वडील आपल्या तिन्ही मुलांना घेऊन रस्ता ओलांडू लागले.
पण दुर्दैवानं कार थांबली नाही आणि कारनं त्यांना धडक दिली. या धडकेनंतर ३ वर्षीय टिमोफी ३० फुटांवर उडून पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर पुशचेअरमधील जुळे भावंडही जखमी झाले. सुदैवानं तिन्ही चिमुरडे बचावले आहेत. पण त्यांना गंभीर दुखापत झालीय.
दरम्यान, अपघातानंतर कार चालकाला आपली चूक कळली आणि त्यानं आपली टोपी आपटून स्वत:वरील रागही व्यक्त केला.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.