इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचं स्वागत करणाऱ्या बलुच नेत्यांवर पाकिस्तानात गुन्हे दाखल झालेत.
ब्रहमधाग बुग्ती, हरबियार मारी आणि बनुक करीमा बलोच या नेत्यांना पाकिस्ताननं देशद्रोहाच्या खटल्यांमध्ये खेचलंय.गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानचा प्रश्न चिघळतोय.
बलुच नेत्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात सांगितलं होतं. त्याचं स्वागत करणाऱ्या बलुच नेत्यांवर आता पाकिस्तान सरकारनं डूख धरल्याचं स्पष्ट झालंय.
पाकिस्तानविरुद्ध अघोषित युद्ध पुकारल्याचा ठपका या बलुच नेत्यांवर ठेवण्यात आलाय. पाकिस्तानच्या या भूमिकेचा पॅरीस, लंडनमध्ये राहणाऱ्या बलुचिस्तानी नेत्यांनी निषेध केलाय.