मुलीनंतर आता ट्रम्प यांच्या जावयाची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनर याला व्हाईट हाऊसमधली एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

Intern - | Updated: Mar 29, 2017, 05:49 PM IST
मुलीनंतर आता ट्रम्प यांच्या जावयाची व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती title=

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी आपला जावई जेरेड कुशनर याला व्हाईट हाऊसमधली एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. खरंतर राजकारणाच्या बाबतीत 36 वर्षीय कुशनर तितकेसे अनुभवी नाहीत, कुशनर नवशिके असले तरीही त्यांना डॉनल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

ट्रम्प यांनी कुशनर यांना आपला वरिष्ठ सल्लागार म्हणून नेमलं आहे. त्याचसोबत त्यांना इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारावेळी दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी कसं काम करता येईल, या विषयावर कुशनर काम करणार आहेत.

अमेरिकेत राहणाऱ्या नोकरशाहांचा कायापालट करण्याची आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम कुशनर आता करणार आहेत. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून शिकलेले कुशनर रिअल इस्टेटशी संबंधित आहेत. त्यामुळे यासंबंधी नवीन कल्पना देऊन त्यांनी सरकारला मार्गदर्शन करावं, अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात आहे.