मॅन्चेस्टर स्फोट प्रकरणी आणखी दोघांना अटक

इंग्लंडमध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीये.

Updated: May 25, 2017, 11:44 PM IST
मॅन्चेस्टर स्फोट प्रकरणी आणखी दोघांना अटक  title=

मॅन्चेस्टर : इंग्लंडमध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीये. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता आठावर गेलीये.

विदिंग्टन इथं एकाला आणि मँचेस्टरमध्येच एका अपार्टमेंटमधून दुसऱ्या संशयिताला अटक केल्याची माहिती ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी ट्विटरवरून दिलीये. मँचेस्टरमध्ये झालेल्या स्फोटात 22 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून अद्याप हल्ल्यांची भीती टळली नसल्याचं पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटलंय.