www.24taas.com, कनेक्टिट
अमेरिकेमध्ये कनेक्टिकट राज्यातल्या न्यूटाऊन शहरात माथेफिरुनं केलेल्या अंदाधूंद गोळीबारामुळे खळबळ उडालीए... एका खाजगी शाळेमध्ये हा गोळीबार झालाय. गोळीबारामध्ये 27 जणांचा मृत्यू झालाय. माथेफिरुनं जवळपास 100 राऊंड गोळीबार केला गेलाय. मृत 27 जणांमध्ये 20 मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर शाळेतील प्रिंसिपल आणि कर्मचा-यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. तर गोळीबार करणा-या एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीए. आणि एक जण पोलिसांच्या हाती लागलाय.
अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता ही सुन्न करणारी घटना घडली. एक माथेफिरू आपली आई शिकवत असलेल्या सँडी हूक एलिमेंट्री शाळेत आला आणि त्यानं हॅन्डगननं गोळीबार करायला सुरुवात केली... त्यात गोळीबार करणारा माथेफिरुची आई ठार झालीए. तर त्यानंतर माथेफिरुनं स्वत: गोळी झाडून आत्महत्या केली. सँडी हुक एलिमेंट्री ही न्यूटाऊनमधील एक नावाजलेली शाळा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या शाळेमध्ये 600 मुलं शिक्षण घेतात. मात्र गोळीबार झाला त्यावेळी किती मुलं शाळेत होती याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. मारला गेलेला माथेफिरू कनेक्टिकट शहरातीलच रहिवासी असल्याचं तिथल्या स्थानिक माडियानं सांगितलंय. या घटनेनंतर न्यू टाऊनमधील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेमध्ये गोळीबाराचे अनेक प्रकार घडलेत.
मात्र ख्रिसमसच्या एका आठवडयाआधीच असा प्रकार घडल्यामुळे अमेरिका सुन्न झालीए. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलंय. न्यू टाऊनमधील शाळेतील गोळीबाराच्या घटनेनंतर राष्ट्रपती बराक ओबामांनी गोळीबाराच्या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं. पीडितांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगत ओबामांनी पीडित कुटुंबांना मदतीचं आश्वासन दिलंय. तसंच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोर उपाय योजले जातील असं म्हटलंय.