एक पुरूष आणि महिला फुटपाथवरून गायब

ही घटना साऊथ कोरियातील आहे, स्थानिक बसच्या सीसीटीव्हीमधून हे व्हिडीओ फुटेज मिळालेलं आहे. एक पुरूष आणि महिला बसमधून फुटपाथवर उतरले, मात्र दोन पावलं चालल्यानंतर ते फुटपाथवरच गायब झाले. 

Updated: Feb 25, 2015, 08:21 PM IST
एक पुरूष आणि महिला फुटपाथवरून गायब title=

साऊथ कोरिया  : ही घटना साऊथ कोरियातील आहे, स्थानिक बसच्या सीसीटीव्हीमधून हे व्हिडीओ फुटेज मिळालेलं आहे. एक पुरूष आणि महिला बसमधून फुटपाथवर उतरले, मात्र दोन पावलं चालल्यानंतर ते फुटपाथवरच गायब झाले. 

गायब होण्यासारखं काहीही नव्हतं, पण सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कळलं की, फुटपाथला भला मोठा खड्डा पडला आणि एक पुरूष आणि महिला गटारीत पडले, त्यांना स्थानिक अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांत बाहेर काढलं, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.