भारतीय वंशाचे नायपॉल ब्रिटनमध्ये 'प्रभावशाली'

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक व्ही. एस नायपॉल आणि शिक्षणासाठी लढा देणारी पाकिस्तानची मलाला युसूफजई यांचा समावेश ब्रिटनच्या ५०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे.

Updated: Jan 27, 2014, 10:47 PM IST

www.24taas.com झी मीडिया , लंडन
नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे लेखक व्ही. एस नायपॉल आणि शिक्षणासाठी लढा देणारी पाकिस्तानची मलाला युसूफजई यांचा समावेश ब्रिटनच्या ५०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे.
पहिल्यादां प्रभावशाली व्यक्तींची यादी `द संडे टाइम्स` या वृत्तपत्राने आणि विशेषज्ज्ञ `प्रकाश डेब्रेट` यांनी तयार केली होती. ज्यात वेगवेगळ्या २५ क्षेत्रातील व्यक्तीमत्त्वांचा समावेश होता.
या यादीत मलालाचा समावेश सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये केलेला आहे. तालिबान्यांनी पाकिस्तानात हल्ल्यात मलाला जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर ब्रिटनमध्ये उपचार करण्यात आले होते. तसेच नोबेल पुरस्कारावर नाव कोरणारी मलाला ही सर्वात कमी वयाची व्यक्ती ठरली आहे.
त्रिनिदादमध्ये जन्मलेले सर व्ही एस नायपॉल यांना २००१मध्ये साहित्याचं नोबेल पुरस्कार मिळालेल आहे. सर व्ही एस नायपॉल लेखकांच्या यादीत एकमेव भारतीय वंशाचे लेखक आहेत. या यादीत ब्रिटनच्या ५०० प्रभावशाली व्यक्तींचा समावेश आहे.
भारतीय वंशाच्या अन्य व्यक्तीमध्ये ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे जीपी समितीचे अध्यक्ष डॉ चांद नागपॉल यांचा आरोग्य श्रेणीत सामावेश करण्यात आला आहे. भारतीय वंशाच्या सुनंद प्रसाद याना वास्तुकलेत , जयपुरमध्ये जन्मलेले ड्यूक बँकेचे कार्यकारी प्रमुख अंशु जैन यांचा समावेश अर्थ क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती म्हणून करण्यात आला आहे.
या यादीमध्ये प्रिंस चार्ल्स, विक्टोरिया , नोबेल पुरस्कार विजेती लेखिका हिलरी मेंटेल यांचा समावेश आहे. क्रीडा प्रकारात डेविड बेकहम ऑलिम्पिक चॅम्पियन जेसिका एनीस हिल आणि मो फारा सर्वाधिक प्रभावशाली व्यक्ती आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.