न्यूयॉर्क: 'द फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'नं इंटरनेटवर वायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत सांगितलंय. सध्या यूट्यूबवर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गन फायरिंग ड्रोनचा व्हिडिओ चांगलाच वायरल झालाय.
१४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 'फ्लाईंग गन' दिसते. जी जवळपास दोन लाख वेळा गोळ्या फायर करते. या व्हिडिओमुळं यूएसमध्ये चर्चा सुरू झालीय.
व्हिडिओतून दिसतंय की हे घरगुती मल्टि-रोटर ड्रोन आहे. ज्यातून सेमी ऑटोमॅटिक हँडगन चारवेळा टार्गेटवर फायर करते.
१० जुलैला यूट्यूबवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. १८ वर्षीय ऑस्टिन हॉगोट मेकॅनिकल इंजिनिअरिंच्या विद्यार्थ्यांनं हा व्हिडिओ टाकलाय.
पाहा हा व्हिडिओ -
(Video Courtesy: CatchTheAction on YouTube)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.