VIDEO : पाकच्या गुप्तचर संस्थेची 'आयएसआयएस'शी हातमिळवणी?

आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या आयएसआयएसचा आता भारतातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भारताचा धोका वाढलाय. 

Updated: Jan 29, 2016, 03:55 PM IST
VIDEO : पाकच्या गुप्तचर संस्थेची 'आयएसआयएस'शी हातमिळवणी? title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा धुमाकूळ घालणाऱ्या आयएसआयएसचा आता भारतातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भारताचा धोका वाढलाय. 
 
नुकतंच, आयएसआयएसनं भारतातील ३० हजार जणांशी ऑनलाईन संपर्क केल्याचं उघड झालंय. इराकमधले लपलेला बगदादी आता भारतीयांच्या बाजुला येऊन उभा राहिलाय. आता, मात्र आयएसआयएसनं भारतच्या शत्रुशी म्हणजे पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचंही समोर येतंय. भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसची आर्थिक मदत मिळतेय का?  असा प्रश्न आता उपस्थित झालाय. सीरिया आणि इराकमध्ये आता भारताविरुद्ध दहशतवादी तयार होतायत का? यावरचाच हा एक रिपोर्ट