या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिल्या सेक्स डॉल्स

साधारणपणे बोनसच्या रुपात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू तसेच विशिष्ट रक्कम देतात. मात्र चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अजबगजब गिफ्ट दिलयं.

Updated: Jan 29, 2016, 02:10 PM IST
या कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिल्या सेक्स डॉल्स  title=

पेइचिंग : साधारणपणे बोनसच्या रुपात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही भेटवस्तू तसेच विशिष्ट रक्कम देतात. मात्र चीनमधील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून अजबगजब गिफ्ट दिलयं.

दक्षिण पूर्व चीनच्या एका कंपनीने वार्षिक बोनस म्हणून अविवाहित कर्मचाऱ्यांना चक्क सेक्स डॉल्स भेट म्हणून दिल्यात. या कंपनीने २४ जानेवारी रोजी संध्याकाळी ग्वांगझो येथे पार्टी ठेवली होती. एका चीनी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अविवाहित पुरुषांना सेक्स डॉल्स म्हणून भेट देण्यात आल्या. 

सध्या या सेक्सी डॉल्सचे फोटोच चीनमध्ये चांगलेच व्हायरल झालेत. फेई शियांग शिया नावाच्या व्यक्तीने हे काही फोटो पोस्ट केलेत. कंपनीचे संचाल वांग युझू यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीत काम करणारे तरुण साधारणपणे १९८० ते १९९० या कालावधीत जन्मलेले आहेत. त्यामुळे त्यांना अनोख गिफ्ट देण्याचे कंपनीने ठरवले होते.