युगांडा : मानवतेला वेशीवर टांगणारे जगात सर्व ठिकाणी आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सांभाळणाऱ्या लहान मुलावर अत्याचार करणारी मोलकरणी आपण पुण्यात पाहिली. पुण्यात अमानुषपणे तिने मुलाला बिन बॅगमध्ये आदळले.
या सारखा किंवा त्या पेक्षाही घृणास्पद प्रकार युगांडामध्ये घडला आहे. युगांडात एक २२ वर्षाची मोलकरीण २ वर्षाच्या मुलीला अमानुषपणे मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही महिला त्या लहान मुलीला जेवण भरवत आहे. पण जेवताना तिला उलटी झाली आणि त्यानंतर या महिलेने तिला जे काही बदडले आहे की ते कोणीही इतक्या चिमुरड्यासोबत करणार नाही. पण तिचा पारा चढला आणि तिने जे काही केले ते या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.