उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब वापरला तर काय होईल?

 उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याने हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याबदद्ल वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे. 

Updated: Dec 10, 2015, 09:33 PM IST
उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब वापरला तर काय होईल?  title=

नवी दिल्ली :  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग याने हायड्रोजन बॉम्ब तयार करण्याबदद्ल वक्तव्य केले आहे. त्यामुळे अमेरिकेला धोका निर्माण झाला आहे. 

विशेष म्हणजे अमेरिका, ब्रि़टन, फ्रान्स आणि रशिया हे उत्तर कोरियाचा अण्विक कार्यक्रम रोखू इच्छित आहेत. या सर्वांना आतापर्यंत कळू शकले नाही की उत्तर कोरियाची आण्विक शक्ती किती आहे. 

कसा असतो हायड्रोजन बॉम्ब?  
हायड्रोजन बॉम्बमध्ये चेन रिअॅक्शन फ्युजन असते. हा अणू बॉम्ब पेक्षा अनेक पटीने विनाशकारी आणि घातक असतो. अंदाज लावला जोता की उत्तर कोरियाच्या यांगयोग न्युक्लिअर रिसर्च सेंटरमध्ये हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यात येत आहे. 

पण हे रिअॅक्टर २००७ मध्ये बंद करण्यात आले होते. हायड्रोजन बॉम्बमध्ये हायड्रोजनच्या स्मस्थानिक ड्यू टीरिअम आणि ट्रायटिरियमची आवश्यकता असते. हायड्रोडजन बॉम्बमध्ये अणूचे संलयन केल्यावर स्फोट होतो. या संलयनासाठी उच्च तापमान म्हणजे ५००,००,००० डिग्री सेल्सिअसची आवश्यकता असते. 

यांगयोग न्युक्लिअर रिसर्च सेंटरमध्ये १९६१मध्ये काम सुरू झाले ते २००७ मध्ये बंद करण्यात आले. यांगयोग न्युक्लिअर रिसर्च सेंटरचे काम १९६१पासून सुरू झाले. ते १९६४मध्ये बनून तयार झाले. 

उत्तर कोरियासाठी हे सेंटर खूप महत्त्वाचे आहे. या सेंटर २००७ मध्ये बंद करण्यात आले. पण उत्तर कोरियाच्या सरकारने त्याला पुन्हा २०१३मध्ये सुरू केले होते. पण दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संघटनेचा दावा आहे की उत्तर कोरियाकडे कोणताही हायड्रोजन बॉम्ब नाही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.