असे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले

 वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात  आले. 

Updated: Dec 9, 2015, 04:36 PM IST

लंडन :  वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात  आले. 

त्याचे झाले असे की, रिटेल मर्केंडाइज एक्सपर्ट क्लेअर हिने मुलाखत दिली तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांने तिला पाहिले नव्हते. तिला न पाहता नोकरीची ऑफर दिली. जॉइन केल्यानंतर थोड्या वेळातच एचआर मॅनेजरकडून तिला ड्रेसकोडचा इमेल आला. त्यात स्पष्ट लिहिले होते. की कंपनीचा कोणताही कर्मचारी टॅटू करत असते तर त्याला झाकून ठेवावे. नाही तर ग्लव्स घालून काम करावे. 

क्लेयर हिला माहिती होते की तिच्या शरिरावर जितके टॅटू आहे. ते झाकण्यासाठी बुरखा घातला तरी ती झाकू शकत नव्हती. ग्लव्स घातले तरी काम होणार नाही. ती एच आर मॅनेजरकडे गेली. त्याने काही ऐकले नाही. त्याने लगेच तिला एक्झिट लेटर दिले. हे सर्व झाले केवळ ३० मिनिटांमध्ये... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.