नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांना डायलिसिसचा त्रास असल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सुषमा स्वराज यांची एक किडनी खराब झाल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यावर किडनी ट्रांसप्लांटची शस्त्रक्रिया गरजेची आहे. सुषमा स्वराज यांची प्रकृती बिघडल्याने देशातीलच नाही तर परदेशातही त्यांचे हितचिंतक चिंता व्यक्त करत आहे. सुषमा स्वराज यांनी अनेकदा परदेशातील व्यक्तींनाही मदत केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत मिळवून दिली आहे.
देशभरात चिंता व्यक्त होत असतानाच एक बलूच नेता सुषमा स्वराज यांने देखील स्वराज यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. बुधवारी जेव्हा सुषमा यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांनी एक ट्विट केलं. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'भगवान कृष्ण बलूच लोकांची बहिण सुषमा स्वराज यांना लवकर बरं कर.' अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. अनेकांनी त्यांना किडनी देण्याची देखील तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानातूनही त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे ट्विट आले.
@SushmaSwaraj Even i am ready to donate in case it is useful for your treatment
— Siddarth Pai (@siddarthpaim) November 17, 2016
@SushmaSwaraj
Get Well Soon ....
Regards Pakistani— The Qatari Prince (@AHFarooqui) November 16, 2016
@SushmaSwaraj @DurgaMenon
बहन मेरा ब्लड़ ग्रुप 0+ हॆ
कृप्या अपने छोटे भाई को जरूर याद करना
जय जय श्रीकृष्ण https://t.co/zztwjtrbPG— Hariom sharma (@Harioms25807810) November 16, 2016