जगातील सर्वात सुंदर १० तरुणी

जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं. सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नशिब आजमवतात. त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात. 

Updated: Jan 6, 2016, 09:03 PM IST
जगातील सर्वात सुंदर १० तरुणी title=

मुंबई : जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं. सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नशिब आजमवतात. त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात. 

जगातील सर्वात सुंदर तरुणी : 

१०. शकिरा : कोलंबियामधील गायक आणि  मॉडेल ही जगात सर्वात सुंदर तरुणींच्या यादीमध्ये १० व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात पावरफूल महिलांमध्ये तिचं नाव आहे. जगात एक प्रसिद्ध डान्सर म्हणूनही तिची ओळख आहे.

९. प्रियंका चोपडा : एकेकाळची मिस वर्ल्ड आणि बॉलीवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा ही जगातील सर्वात सुंदर तरुणींच्या यादीत ९ व्या स्थानकावर आहे. प्रियंका ही गायकही आहे. तिच्या उत्कृष्ठ अभिनयामुळे तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहे.

८. केट अपटोन :  अमेरिकेची मॉडेल केट ही  जगात सर्वात सुंदर तरुणींच्या यादीमध्ये ८ व्या स्थानकावर आहे. जगातील सर्वात सेक्सिअस्ट वूमन म्हणूनही तिची ओळख आहे.

७. टेलर स्विफ्ट : अमेरिकेतील गायक टेलर ही नॅरेटीव गाणे लिहण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. तिने आतापर्यंत अनेक गाणी लिहली आणि म्हटली आहेत. तिच्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.

६. गल गडोत : मिस इस्राईल आणि फॅशन मॉडेल गल ही जगातील सर्वात सुंदर तरुणींच्या यादीत ६ व्या स्थानकावर आहे. तिची स्वत:ची कपड्यांची कंपनी आहे. फास्ट अँड फ्यूरिअस या सिनेमामध्येही तिने काम केले आहे.

५. इमा वॉटसन : हॅरी पॉटरमधील अभिनेत्री सुंदर तरुणींच्या यादीत आहे. अभिनेत्री, मॉडेल आणि अक्टीविस्ट म्हणून तिची ओळख आहे. 

४. कॅनडीस स्वॅनेपोएल : दक्षिण आफ्रिकेची ही सुंदरी कमाईच्या बाबतीत टॉप मॉडेल मानली जाते. कॅनडीसचा जगातील चौथी सर्वात सुंदर तरुणी आहे.

३. दीपिका पदुकोण : बॉलीवूडची डिंपल गर्ल ही जगातील तिसरी सर्वात सुंदर तरुणी आहे. फिगर, स्माईल आणि उंचीसाठी दीपिका ओळखली जाते. बॉलीवूडची सर्वात आकर्षित अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख आहे.

२. जेनीफेज लोपेज : अमेरिकेतील अभिनेत्री, लेखक, फॅशन डिजायनर, प्रोड्युसर आणि गायक अशी जेनीफेजची ओळख आहे. जेनीने आतापर्यंत ३ वेळा लग्न केलं आहे. सिने क्षेत्रातील व्यक्तीमत्वासह ती उद्योगपती म्हणून ओळखली जाते.

१. शेलेन वूडले : हॉलीवूड स्टार शेलेन ही जगातील सर्वात सुंदर तरुणी आहे. अमेरिकेची अभिनेत्री शेलेन हिने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.