'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...

पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.   

Updated: Mar 17, 2015, 12:06 PM IST
'व्हॉटस्अप'वर पुरुषाचा अपमान केला म्हणून...  title=

जेद्दा : पुरुषप्रधान मुस्लिम संस्कृतीत एकाद्या महिलेला कसा न्याय दिला जातो, याचं धक्कादायक उदाहरण सौदी अरेबियात नुकतंच पाहायला मिळालंय. व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला म्हणून महिलेला चक्क चाबकाचे फटके देण्याची शिक्षा सुनावण्यात आली.   

'ओकेज्' या वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, पूर्व सौदी अरबच्या फौजदारी न्यायालयानं हा आदेश दिला... तिचा गुन्हा एव्हढाच होता की, तिनं व्हॉटसअपवर एका पुरुषाचा अपमान केला होता. या गुन्ह्याची शिक्षा म्हणून संबंधित ३२ वर्षीय महिलेला ७० चाबकाचे फटके आणि २० हजार सौदी रियाधचा (५,३३२ डॉलर)  दंड भरण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय.

या प्रकरणात ही महिला कोणत्या देशाची नागरिक आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. 'गल्फ न्यूज'नं दिलेल्या बातमीनुसार, या महिलेनंही आपण त्या पुरुषाचा अमान केल्याचं कबूल केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.