www.24taas.com, झी मीडिया, लंडन
एका महिलेच्या स्तनात स्फोट झाला, ही काय मस्करी नाही हा अपघात आहे. एका महिलेने आपल्या ब्रेस्टचा आकार वाढविण्यासाठी ब्रेस्ट इंप्लांट सर्जरी करीत होती. त्याचवेळी एक स्फोट झाला. ही दुर्घटना इंग्लडच्या एका जीम इंस्ट्रक्टर सोबत झाली.
सुमारे चार लाख रूपये खर्च करून या महिलेने ब्रेस्ट इंन्प्लांट केले होते. इंप्लांटमध्ये स्फोट झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. किम ब्रॉकहर्स्ट असे या महिलेचे नाव असून ती ५१ वर्षांची आहे. आपल्या व्यक्तीमत्वात बदल घडण्यासाठी तीने ही सर्जरी केली होती. सुरूवातील सर्वकाही व्यवस्थित होते. पण तिच्या स्तनांचा आकार अचानक वाढू लागला. इंप्लांटमध्ये चूक झाल्याने बसविलेल्या पॅडमध्ये तडे जाऊ लागले. सिलिकॉन लिक होऊन ते शरिरातील दुसऱ्या भागात पसरू लागले. एक दिवशी किमला डाव्या स्तनात जोरदार आघात झाला आणि स्तनात स्फोट झाला.
स्तनांचा आकार पुन्हा सामन्य करण्यासाठी डॉक्टरांनी ३ लाख ८७ हजार रुपये खर्च सांगितला. यात धोका असा होता की, सिलिकॉन शरिराच्या दुसऱ्या भागात पसरत होते. ही हकिकत तिने एका चॅनलला सांगितले. त्यांनी किमच्या इलाजाचा खर्च उचलला. संपूर्ण प्रोसेसची व्हिडिओ शुटिंग केली आणि पुन्हा सर्जरी करून किमला जीवनदान दिले. चॅनलने या प्रकरणाचा एक कार्यक्रम केला. महिलांनी स्तनाचा आकार वाढविण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे याची या कार्यक्रमात माहिती दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.