कॅनडा : एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला किस केलं आणि तिचा मृत्यू झाला असं तुम्ही कधी ऐकलंय ? पण अशी एक धक्कादायक घटना घडली आहे कॅनडामधील मॉन्ट्रियालमध्ये. २० वर्षाच्या या तरुणीला नट्सची अॅलर्जी होती आणि तिच्या बॉयफ्रेंडने पीनट बटर वाला सँडविच खालं होतं.
मिरियम ही एका पार्टीमध्ये गेली होती तेव्हा ही घटना घडली. मिरियमची आई मिशेलिनने लोकांना जागरुक करतांना म्हटलं की, कोणत्याही वस्तूची अॅलर्जीची माहिती नसणं हे हानिकारक ठरु शकतं. या तरुणीची तिच्या बॉयफ्रेंड सोबत नवी मैत्री झाली होती पण तिच्या या अॅलर्जीबाबत त्याला तिने काहीच सांगितलं नव्हतं.
पार्टीनंतर जेव्हा मिरियम बॉयफ्रेंडच्या घरी गेली. त्यानंतर बॉयफ्रेंडने बेडवर जाण्याआधी पीनट बटर सँडविच खालं आणि त्यानंतर ब्रश पण केला होता. बॉयफ्रेंडने मिरियमला किस करताच काही मिनिटांमध्ये तरुणीची प्रकृती बिघडली. तिला श्वास घेतांना त्रास होऊ लागला.
तरुणीने त्याला विचारलं की तू शेंगदाणे खालेस का ? त्यानंतर तिला कळून चुकलं की आपल्यासोबत असं का होतंय. रुग्णालयात जाण्यापूर्वीच या तरुणीने आपले प्राण सोडले. तरुणीच्या आईने अशा प्रकारच्या अॅलर्जी असणाऱ्या लोकांसाठी मेडिक अलर्ट देणारा ब्रेसलेट झालण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे ज्यांना या अॅलर्जीची माहिती नसेल त्यांना याबाबत माहिती होईल. सोबतच अशा लोकांनी नेहमी यावर उपाय करणाऱ्या मेडिसन जवळ ठेवण्यास सांगितलं.