पाकिस्तानात अमेरिकेच्या ड्रोण हल्ल्यात ओसामा बिन लादेनसह अल कायद्याचे अनेक महत्वाचे नेते अल्लाला प्यारे झाले, त्यामुळे अल कायदाच्या नेतृत्वाने आता उत्तर आफ्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या ड्रोण हल्ल्यांमुळे अल कायद्याचे अक्षरश: कंबरडं मोडलं. अल कायदाचे उरले सुरले वरिष्ठ नेते थोडा अधिक जोर का झटका दिला तर कब्रस्तानात पोहचू शकतं असं ब्रिटीश गुप्तचर संघटनेच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. अमेरिकेच्या कमांडोंनी २ मे रोजी अबोटाबाद इथे केलेल्या कारवाईत ओसामा बिन लादेनचा खातमा झाला.
अल कायदाचे दोन वरिष्ठ नेते लिबयात दाखल झाल्याचं सूत्रांचे म्हणणं आहे. त्यामुळेच भविष्यात उत्तर आफ्रिकेत जिहाद छेडलं जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अफागाणीस्तानातील जिहादचा अनेक वर्षांचा अनुभव असलेले अल कायदाचे नेतृत्व अफगाणीस्तानातील तळ सोडून मध्य पूर्वेतून आफ्रिकेकडे रवाना झालं. त्यापैकी काही जणांना वाटेत रोखण्यात यश आल्याचं तर काही जण पोहचल्याचं वृत्त आहे. आता पाकिस्तान सुरक्षित राहिलं नसल्याचं वास्तव यामागे आहे की अबर जगतातल्या उद्रेकाचा फायदा उठवण्याचा प्रयत्न अल कायदाचं नेतृत्वाने करण्याचं ठरवलं आहे ते कळण्यास मार्ग नाही.
पण उत्तर आफ्रिकेत अल कायदाने हातपाय पसरवल्यास एका नव्या युध्द भूमीवर जिहादची सुरवात होण्याची भीती आहेच. अफगाणीस्तानात आता फक्त १०० च्या आसपास अल कायदाचे दहशतवादी शिल्लक राहिले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.