www.24taas.com, इस्लामाबाद
कराचीहून इस्लामाबादला जाणाऱ्या विमानाला अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. भोजा एअरलाइन्सच्या या विमानात १२७ जण प्रवास करीत होते. हवामान बिघडल्यामुळे हा अपघात झाल्याचे जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
रावळपिंडीच्या चकलाला एअरबेसजवळ शुक्रवारी सायंकाळी भोजा एअरलाइन्सचे प्रवासी विमानाचा अपघात झाला. यात ११८ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर होते. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हे विमान एका दफनभूमीवर पडले आणि त्याने पेट घेतला. या अपघातात कोणत्याही नागरिकाच्या वाचण्याची शक्यता फार कमीच दिसते आहे.