'प्रभाकरन'च्या मुलाच्या हत्येचं चित्रिकरण

युकेच्या चॅनेल ४वर दाखवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याच्या मुलाचं शव दाखवण्यात आलं आहे. या १२ वर्षीय मुलाच्या छातीत ५ गोळ्या घुसल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं.

Updated: Mar 13, 2012, 10:45 AM IST

www.24taas.com, कोलंबो

 

युकेच्या चॅनेल ४वर दाखवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये 'लिट्टे' प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याच्या मुलाचं शव दाखवण्यात आलं आहे. या १२ वर्षीय मुलाच्या छातीत ५ गोळ्या घुसल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं.

 

१८ मे २००९ रोजी जीनेव्हा येथील एफआयएफडीएच फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रभाकरनच्या मुलाच्या हत्येचं फुटेज दाखवण्यात आलं. हेच फुटेज चॅनेल ४ मध्ये बुधवारी दाखवलं जाणार होतं.चॅनेल ४ च्या वृत्तानुसार या धक्कादायक ‘ट्रॉफी व्हिडिओ’मध्ये प्रभाकरनच्या संपूर्ण कुटुंबाला किती थंड पद्धतीने संपवण्यात आलंय, याचं चित्रण आहे.

 

दरम्यान, श्री लंकन उच्च आयुक्तालयाने यातील सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. 'श्री लंक’ज किलींग फिल्ड्सः वॉर क्राईम अनपनिश्ड' या ६० मिनिटांच्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवल्या गेलेल्या फुटेजेसमुळे UNHRC च्या अधिवेशनात श्री लंकन प्रतिनिधींची चांगलीच नाचक्की झाली. लिट्टेच्या उग्रवाद्यांना उध्वस्त करण्यासाठी सुरू केलेल्या मिशनची गेल्या वर्षी 'चॅनल ४'ने डॉक्युमेंटरी केली.