इनसायडर ट्रेडिंग प्रकरणी अटक झालेल्या रजत गुप्तांची १० मिलियन डॉलर्सच्या जामीनावर आणि अमेरिका न सोडून जाण्याच्या अटीवर सुटका करण्यात आली आहे. रजत गुप्तांच्या खटल्याची सूनावणी एप्रिल ९ रोजी होणार आहे. गोल्डमन सॅक्सचे माजी संचालक रजत गुप्ता यांनी आपण दोषी नसल्याची याचना केली.
रजत गुप्ता यांनी गोल्डमन सॅक्स आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपन्यांच्या संचालकपदी असताना गोपनीय माहिती आपले मित्र राज रत्नम यांना पुरवल्याप्रकरणी इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. फंड मॅनेजर राज राजरत्नम या माहितीच्या आधारे कंपन्यांच्या समभागांची खरेदी आणि विक्री संबंधित कंपन्या महत्वाच्या घोषणा करण्याच्या आधीच करुन प्रचंड नफा कमावत असत. एफबीआयने केलेल्या फोन टॅपिंगमधून हे प्रकरण उघडकीस आलं. रजत गुप्ता यांनी न्यु यॉर्कमध्ये एफबीआयच्या कार्यालयात शरणागती पत्करली होती.