www.24taas.com , लंडन
जगाची ओळख होण्यासाठी आणि हे जग कसे निर्माण झाले, याचा ध्यास प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी जगाच्या उत्पत्तीचे गुढ उकलण्यासाठी संशोधन केले. अशा स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत आहे. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे.
शास्त्रज्ञ हॉकिंग 'ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम'सारखे पुस्तक लिहून सामान्यांपर्यंत विज्ञानाची कास आणि गंमत पोहोचविली आहे. 'न्यू सायंटिस्ट' या नियतकालिकाने हॉकिंग यांना प्रश्न विचारला, की तुम्ही सर्वांत जास्त वेळ कशाचा विचार करता? यावर त्यांनी उत्तर दिले ते असे, 'स्त्रिया. त्या पूर्णपणे गुढ आहेत.'
हॉकिंग यांचा उद्या रविवारी ८ जानेवारी २०१२ ला सत्तरावा वाढदिवस असून, त्यानिमित्त 'विश्वाची स्थिती' हा कार्यक्रम केम्ब्रिज विद्यापीठात आयोजित केला आहे. केम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन केलेले हॉकिंग तरुणपणीच दुर्धर आजारामुळे चाकाच्या खुर्चीला खिळून राहिले आहेत, त्यानंतरही विज्ञानाच्या क्षेत्रातील आपले अमूल्य योगदान ते देतच राहिले आहेत.
शास्त्रज्ञ स्टीफन यांचा अल्प परिचय
केम्ब्रिज विद्यापीठात अध्यापन केले आहे. २१ वर्षांचे असताना हॉकिंग यांना झालेल्या motor neurone या रोगाचे निदान झाले. त्यानंतर ते खचले नाहीत. त्यांनी त्यावर मात करून आपले कार्य सुरू ठेवले. कमी वयात असाध्य रोग हूोऊनही त्यांनी आपले संशोधन सुरू ठेवले.
हॉकिंग यांनी यांनी आपल्या जीवनात दोन लग्न केलीत. मात्र, त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले नाही. त्यांनी दोन्ही पत्नींशी कालांतराने काडीमोड घेतला. जेन वाईल्ड यांच्याशी हॉकिंग यांचे १९६५ मध्ये लग्न झाले, खुर्चीला खिळलेल्या हॉकिंग यांची काळजी जेन यांनी १९९१ पर्यंत घेतली, परंतु नंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
हॉकिंग यांना मिळाणारी प्रसिद्धी आणिी त्यांच्या अपंगत्वामध्ये होत असलेली वाढ यामुळे त्यांचे पहिले वैवाहिक आयुष्य संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या पत्नीपासून त्यांना रॉबर्ट, ल्युसी, तिमोथी अशी तीन अपत्ये आहेत.
पहिल्या घटस्फोटानंतर१९९५ या वर्षी हॉकिंग यांनी त्यांच्या नर्स ईलेन मेसन यांच्याशी विवाह केला. हॉकिंग यांच्यासाठी बोलका संगणक तयार करून देणारे अभियंते डेव्हिड मेसन यांच्यापासून ईलेन यांनी घटस्फोट घेतला होता. ईलेन यांच्याबरोबरचे हॉकिंग यांचे वैवाहिक आयुष्य अवघडले व ऑक्टोबर २००६ मध्ये त्यांनी घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला.